शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

मी वेडा तुझ्यात...

मी वेडा तुझ्यात....

तू वेडी आहेस,
अनं मी तुझ्यात वेडा..
कितिदा गं गाऊ मी,
तुझ्या सौंदर्याचा पाढा।

        मी रागावतो ना तुझ्यावर,
        न पटल्यावर मला काही।
       आवडतो मला तोही क्षण,
        मग तू माझ्याशी बोलत नाही।।

कधीकधी तुझ्या हसण्यापेक्षा,
तूझे रुसणे मला आवडते।
नकळत तुला मनवता मनवता,
मग मन माझे मज रडवते।।

          हाच तुझ्यातला वेडेपणा,
          मलाही वेडावून जातो    सदा।
          तुझ्या माझ्या प्रीतीची दुनिया,
           एकमेकांसाठी जगण्याचा हा वादा।।

मी वेडा आहे तुझ्यात,
तुही आहेस काय माझ्यात वेडी??
हवं असल्यास...
भांड ना अजून एकदा माझ्याशी
तुझ्या रागात वाढे नात्याची गोडी....!!!

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

कवितेच्या जाळ्यातून

कवितेच्या जाळ्यातून...

आवर, आवर, तुझ्या मनाला आवर।
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर।।

शब्दांचे हे बंधन, भावनांचे इथे गुरफटने,
मनातल्या विचारांना शब्दांत इथे उतरवणे।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर....
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

कोण ऐकतो रे इथे, कुणीच आपलं नाही,
फक्त सजवत जावे ओळींत, येईल मनात जे काही।
आवर, आवर, तुझ्या मनाला  आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

मनात आलेलं सर्व, आपण सहज इथे उतरवतो।
आपल्या भावनांचा खेळ करत, दुसरा हशा पिकवतो।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

कधी सुखावर लिहितोस, कधी दुःखावर लिहितोस,
कशाला विनाकारण स्वगत, या स्वार्थी जगाला बोलतोस।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

बघ रे बघ! आपोआपच कसे शब्द जुळून जातात,
नकळतच कितीतरी मग कविता घडून जातात...
नकळतच कितीतरी मग कविता घडून जातात।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून स्वतःला सावर...।। 

©सागर बिसेन
०१/०३/२०१६
९४०३८२४५६६

"व्यथा"

तंत्रज्ञानात जगतोय म्हणे!
माझा हा भारत देश।
काळ उलटले,वर्षे संपली,
अजूनही बदलला नाही भेष।।

राजकारणावरही राजकारण झाले,
अनेक नवनवे पक्ष आले।
मत देत देत राजकारण्यांना,
सामान्यजण सारे बेजार झाले।।

शासन येते, जाते अनं बदलते,
नवनवी धोरणे जातात आखली।
योजना साऱ्या कागदांवरी राहता,
कार्यपद्धतीची तव कंबर वाकली।।

आशान्वित इथे शेतकरी,
भुकेला झोपतोय माझा बळीराजा।
राबणारा मातीच्या घरातच राहिला,
चैनीत विसावणारा बनला राजा।।

हि व्यथा आहे सर्वांची,
हे चित्र आहे 'महाराज्याचे'।
हे काव्य आहे संपूर्ण भारताचे,
भारत मातेच्या व्याकुळ जनतेचे।।

©सागर बिसेन
३१/०८/२०१६
१६:१६

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

"अजूनही दडलेलं काहीतरी!"

"अजूनही दडलेलं काहीतरी!"

मी नाही विचारलं कधी,
तुला तुझा गेलेला भूतकाळ।
तरीही दरवेळी आशा करतो,
चांगलाच असावा आपला भविष्यकाळ।।

मला काय ठाऊक तुझ्याबद्दल,
काय घडलं आणि काय नाही।
तरीही वाटतं कधीकधी मनाला,
लपून आहे अजूनही खूप काही।।

वाईट तुला, मी का बोलू?
तू सांगितलं नाहीस, तुझी चूक।
गुमानपणे ऐकून घेतो सारं,
जे काही बोलतात लोक अमुक।।

नात्याला जपताना भीती भासते?
कि गुपितामुळे तुटेल असं वाटते?
मात्र जितकी गडप होतील सत्ये,
तितकी मनात माझ्या, भीती दाटते।।

शेवटी....
तुला जपण्यासाठी सर्व ऐकावं,
जाणून वागण्याला तुझ्या,झालेली चूक समजावं।
कळेल कधीतरी तुला असं मनात मानावं,
सांग कधीपर्यंत असं खोटं खोटं जगावं??
सांग कधीपर्यंत असं खोटं खोटं जगावं??

सागर 'अर्णव'
२८/०८/२०१६
२०:००
९४०३८२४५६६

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

त्यांना समजताना

"त्यांना समजताना..."

कमी नाही या जगात,
वेड्या लोकांच्या भरतीला।
माती ठेऊन गहाण,
वेग आलाय भरतीला।।

समजणाऱ्याला समजले नाही,
दुसऱ्याच कुणाला घेऊन बसले।
दुःख हाती आले तव,
मात्र एकटेच रुसत बसले।।

वेडी आहे हि दुनिया,
या दुनियेत वेडे लोक।
आनंदाच्या क्षणांना झिडकारून,
मनवतात नुसतेच शोक।।

ज्यांची गरज होती,
त्यांना नाही शोधलं यांनी।
विसरलेत क्षणार्धातच सारे,
सोसलेत दुःख यांच्यासाठी ज्यांनी।।

©✍ सागर
१४-०८-२०१६
९४०३८२४५६६

मला सोडताना

"मला सोडताना "

नक्कीच!
तिला आनंद होणार नाही,
माझ्या गेल्यावर।
पण त्रास मात्र होतोय,
तिला कि आता असल्यावर।।

प्रेमाची शपथ घेऊन,
क्षण तीही घालवते अनं मीपण।
पण राग अनावर होतो तेव्हा,
अबोल होतो मी अनं तीपण।।

कसंही प्रयत्न मी केला,
समजून घेण्याचा।
पण कदाचित तिला,
गैरसमज होतोय...
जणू तिचं मी जगणेच मागतोय,
असं समज तिला झालाय।।

आतापासूनच समजतंय,
माहितेय मला....
आता रडवताना छान वाटतंय तिला।
नक्कीच दाटून येईल मन,
बघेल जेव्हा ती..
हे जग सोडताना मला।।

©✍सागर
९४०३८२४५६६

रविवार, ३१ जुलै, २०१६

तुझ्याविना

तुझ्याविना!

"मला सांग ना तू आता,
आहे का जगणे शक्य माझ्याविना?
मी तर एकटा वेडा होतो,
जगणेच हरवले जणू तुझ्याविना!

मला सांग ना तू आता,
जातो कसा वेळ तुझा माझ्याविना?
मज एक दिवस साल भासे,
मोजतो दिस हे सारे तुझ्याविना!

मला सांग ना तू आता,
हसतेस का कधी खुशाल माझ्याविना?
इथे तर हसनेच गडप झाले,
नुसताच रडतो मन हा तुझ्याविना!

मला सांग ना तू आता,
वाटे काय कुणी तुझा माझ्याविना?
नुसताच घोळका माझ्या भोवताली,
तरीही निर्जन वाटे जग हे तुझ्याविना!
तुझ्याविना.....तुझ्याविना....!!

✍© सागर बिसेन
९४०३८२४५६६
२९/०७/२०१६
१७:०५

सोमवार, ११ जुलै, २०१६

आला पाऊस आता!

येत नाही, येत नाही,
असा हरकुणी बोलायचा।
बघा आलाय पाऊस आता,
अनुभवा बहर त्याचा।।

रान जागे झाले पुन्हा,
सजलीये सृष्टी सारी।
धुंद पावसात या न्हाहताना,
निर्सगाची हि किमया न्यारी।।

नव पालवी फुटली झाडांवरी,
पुर्नजन्म झालाय लतांचा।
बघून ओलावणारा हा पावसाळा,
मन हर्षित झालाय लोकांचा।।

नांदू लागले सगळीकडे,
गारगार पर्जन्याचे असे वारे।
सुरवात झालीये पेरणीला,
गुंतले शिवारात शेतकरी सारे।।

हा असाच येत राहो,
ज्याची हरकुणी वाट बघतो
येणाऱ्या पावसाने मग ह्या,
माझा हर काव्य बहरून निघतो।।

✍© सागर बिसेन
११/०७/२०१६
९:२०








मंगळवार, ५ जुलै, २०१६

तुझ्या हृदयावर

"तुझ्या हृदयावर"
तुझ्या हृदयावर लिहिलेला ,
मी तो नाव आहे।
जो तुझ्या स्पंदनाचा,
बनलेला गाव आहे।।
वाहे त्यातच रुधिर तुझा,
श्वासही तुझा त्यातच आहे।
तुझ्या हृदयाने घेतला ज्याचा,
तो मी एक ठाव आहे।।
येणार न सोडता तुला,
जीव माझ्यात गुंतला आहे।
प्रीतीचा तुझ्या हृदयावर पडलेला,
मीच तो घाव आहे।।
कितीही लपवशी चेहरा आता,
तरीही सौंदर्यास तुझ्या वाव आहे।
स्मित बहरलेल्या तुझ्या ओठांवरचा,
मीच तो भाव आहे...
मीच तो नाव आहे।।


©सागर 
०४/०७/२०१६
१७.१४

रविवार, ५ जून, २०१६

आधार

             "आधार" 

खरंच नसेल का त्रास होत?
जन्म देणाऱ्या आईबाबाला सोडताना।
नजरेसमोर बायको अन पैसा आला कि,
नाते दोघांशी खचकन तोडताना।।

आपल्या अंगावर खांद्यावर खेळवणाऱ्या,
त्या आई बाबाला आपण विसरतो।
लाखों हजारोंच्या घरात वावरताना,
त्यांना मात्र झोपडीतच सोडतो।।

काळ त्यांचा वेगळा होता,
भूतकाळाशी ते घट्ट जुडून असतात।
चकाकीच्या नवख्या दुनियेत या,
आपल्याला मग ते आवडत नसतात।।

नसते पर्वा आपल्याला कधीच,
त्यांनी आपल्यासाठी केलेल्या परिश्रमाची।
अहंकारात बुडून मुलगा जगतो,
जास्त काळजी त्याला त्याच्या इभ्रतीची।।

कितीही केलं सत्कार्य तरी,
पाहिजे तसं पुण्य मिळणार नाही।
लाभणार नाही खरं आनंद आयुष्यभर,
जर जिवंतपणी आईबाबा जवळ असणार नाही।।

©✍ सागर बिसेन
९४०३८२४५६६

शुक्रवार, १३ मे, २०१६

पुन्हा एकदा!

             "पुन्हा एकदा!"

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा कुरवाळू पाहतोय...
त्या संपलेल्या दिवसांत,
पुन्हा जगु पाहतोय...
सोबत घालवलेल्या क्षणांना,
पुन्हा एकदा अनुभवू पाहतोय।।

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा वेचू पाहतोय...
नयनांच्या आश्रयाखाली,
अश्रूंनी ओलंचिंब भिजवू पाहतोय...
रडताना आजही तेच अश्रू,
आतल्या आत गोठवून पाहतोय।।

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा साठवू पाहतोय...
नजरेखाली जपत जपत,
अमर्याद राखू पाहतोय...
सोबत घालवलेल्या त्या क्षणांना,
पुन्हा एकदा घडवू पाहतोय।।

© सागर
१३/०५/२०१६
२०:१५

बुधवार, ४ मे, २०१६

आता काय बोलावं?

आता काय बोलावं?

मला तू हवी असण्यापेक्षा,
मीच तुला नको आहे।
तुझ्या विरंगुळ्यात मी नको आहे...
त्रास होतो तुला मी असण्याचा,
वैताग येतो तुला मी बोलल्याचा।

चुका मलाच कळतात,
तुला त्या दिसत नाही...
कारण मी चुकतो दरवेळी,
तू नाही।
आयुष्यात असंच लिहिलंय आता,
मैत्रीत पण भांडण होतात,
पण तुला कधी सोडवता आला नाही...
अन मी केलेलं प्रयत्न,
तुला कधी दिसलं नाही।

मी तयार आहे मान्य करायला,
चुकलं नसेल तरी अपराधी व्हायला,
पण तू? तू कुठे असतेस तेव्हा?
कुठे मरतात तुझ्या भावना?
कुठे संपतात तुझी प्रलोभने,
तुझी आश्वासनं?

शेवटी काय तुला जगता येईल आनंदात,
कारण तुला हे सोयीचं आहे...
माझं नसणं हि तुला अपेक्षित आहे।
मैत्रीची व्याख्या तुला वैर आहे,
मी तिखट बोललेलं तुला गैर आहे।

शेवटी मीच चुकत आलो,
समजावण्याचं आर्जव घालत आलो।
लिहिता येतं तुला,
बोलता येतं तुला,
पण समजू कधी शकली नाहीस...
कारण शेवटी मी बेक्कार आहे,
मी 'असाच' आहे, हि समज तुला झाली।

आणि म्हणून..
माझ्या रडण्यावरही तुला,
कधी वाईट वाटलं नाही,
कधी मन गहिवरून आलं नाही..
तू अजूनही हसतेच आहेस,
माझ्या या बोलण्यावर,
माझ्या या मैत्रीवर,
माझ्या या रडण्यावर।।

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
०५/०५/२०१६
९:१०

मंगळवार, ३ मे, २०१६

बरसणाऱ्या पावसात

"बरसणाऱ्या पावसात"

"पावसात भिजायला आवडते,
बेधुंद नाचायला आवडते।
ओल्याचिंब झालेल्या अवस्थेत,
तुला बिलगायला आवडते।।

बेभान होऊन यौवनात,
तुझ्यासवे हुंदळायला आवडते।
केसांवरून ओल्या ओझरणाऱ्या,
त्या थेंबास बघायला आवडते।।

फुलताना सौंदर्य पावसात,
तुला मंद-धुंद बघायला आवडते।
गोऱ्यापान कायेवरून ओसरणाऱ्या,
सरी झेलायला मज आवडते।।

रिमझिम बरसणाऱ्या पावसात,
तुला गळाभेट करायला आवडते।
बेभान होऊन बरसणाऱ्या धारांत,
तू अन मी 'एक' व्हायला आवडते।।"

:- सागर बिसेन
९४०३८२४५६६
११:१५

रविवार, २४ एप्रिल, २०१६

तुझ्यात स्वतःस शोधताना

"तुझ्यात स्वतःस शोधताना"

मीपण हरवून मी माझे,तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।
सोडून साऱ्या माझ्या वाटा,तुझ्याकडूनच जगण्याचा बोध घेतो।।

मज न कळे आता,
काय खोटे नि काय खरे।
दाही दिशांतून फिरता फिरता,
फक्त तुझाच वेध घेतो...
मीपण हरवून मी माझे,
तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।।

भीती नाही आता कशाची,
जगताना आतून जोश येतो।
बेधुंद, बेभान चालणे आता,
झुगारून वाटेत जो अवरोध येतो...
मीपण हरवून मी माझे,
तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।।

तमा नाही हरण्याची, खंगण्याची,
तुझ्या जगात स्वतःस मिरवतो।
हसऱ्या छवीस बघताना तुझ्या,
आपसूकच मनातला क्रोध हरवतो...
मीपण हरवून मी माझे,
तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।।

सोडून साऱ्या माझ्या वाटा, तुझ्याकडूनच जगण्याचा बोध घेतो।।

© सागर बिसेन
२४/०४/२०१६
२०:५५
९४०३८२४५६६

शनिवार, २ एप्रिल, २०१६

आता तुला माफ आहे.

"आता तुला माफ आहे."

तू केलेली चुकही,
आता तुला माफ आहे।
तू अबोल असणेही,
म्हणजे डोक्याला ताप आहे।।

समजावून समजावून थकलो,
तरी तोच आलाप आहे।
तुझ्या समजुतीवर सारखी,
वेड्या मनाची छाप आहे।।

कसं समजणार तुला?
हाच प्रश्न, प्रश्नांचा बाप आहे।
भर उन्हाच्या कडाक्यातही,
मला आलाय हिवताप आहे।।

हेही माहित नाही तुला,
'मैत्री' शब्दात किती व्याप आहे।
जणू वाटू लागले आता,
विचारांत आपल्या खूप गॅप आहे।।

काय करावी आशा चांगल्याची,
तुला समजावणेही पाप आहे।
म्हणून तू केलेली चुकही,
शेवटी तुलाच माफ आहे।।

© सागर बिसेन
०३/०४/२०१६
११:००

बुधवार, ३० मार्च, २०१६

विस्कटलेले शोधताना

     "विस्कटलेले शोधताना"

वादळागत जगणे झाले लोकांचे,
अचानकच येऊन निघून जाणे।
विस्कटून सजलेले आयुष्य सारे,
क्षणार्धातच नाते तोडून जाणे।।

आपण जपतो क्षणाक्षणाला नाते,
सदा काळजीने राखून ठेवणे।
मती हरवते आपल्याच लोकांची,
आवडते त्यांस हरवून जाणे।।

निर्जीव होतो जीव हा,
स्वतःच जणू स्वतःस हरपणे।
तरीही पुन्हा शोधात त्यांच्या,
शोधवाटा पुन्हा चालून जाणे।।

व्याधी त्यांच्या मनातली ही,
मधातच आयुष्याला पोखरून जाणे।
तमा नाही रे बेफिकीरांना मग,
आयुष्यात इतरांच्या आग लावून जाणे।।

शेवटच्या क्षणावरी तरीही हीच आशा,
येईल भान, पुन्हा जुळतील मने।
आपल्याच लोकांनी उठवलेल्या वादळात,
एकटेच विस्कटलेले शोधत बसणे।।

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
३० मार्च २०१६
२३.३५

सोमवार, २८ मार्च, २०१६

वाचा थोडं ऍडजस्ट करूनच

📖🖋 🚂🚃🚃🚋
ट्रेनच्या प्रवासात उभ्या उभ्या जागा ऍडजस्ट करण्यातच संपूर्ण प्रवास संपतो आणि त्यातच काही शब्द ऍडजस्ट करता करताच कविताही घडते......

✍🏽"वाचा थोडं ऍडजस्ट करूनच" 📖

सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत,
आता सर्वच गोष्टी,
ऍडजस्ट करून घ्याव्या लागतात..
मग दिवसभराचे कार्यक्रमही,
याला अपवाद नाही.
कोणत्याही गोष्टीशी संबंध जोडला तरी,
त्यात काही वाद नाही.

यामधात येणाऱ्या सर्व गोष्टी,
आता ऍडजस्टच कराव्या लागतात.
कोण जाणे का तर,
मात्र प्रत्येकजण तसेच वागतात...
यात प्रवासही वेगळा नाही,
ट्रेनच्या गर्दीपासून, बसच्या सीटपर्यंत,
आता सर्वच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात.

दिवसाच्या सुरुवातीपासून,
त्याच्या संपेपर्यंत सर्व ऍडजस्टच..
मित्रही बनवावे लागतात ऍडजस्ट करूनच,
नातेही जपावे लागतात ऍडजस्ट करूनच,
शेवटी,
मित्रांना वेळही  द्यावा लागतो...
तोही ऍडजस्ट करूनच.

नुसतीच इकडेतिकडे धावपळ आजकाल,
अनं तीही भर गर्दीतून,
अड्जस्टच करून करावी लागते..
ऍडजस्ट करूनच कामाचे ओझे,
मग कुठेतरी हलकं  होते.

कॉलेजला ऍडजस्ट, शाळेत ऍडजस्ट,
बंकही ऍडजस्ट, होमवर्कही ऍडजस्ट...
करूनच करावं लागतं.
पेपरला मार्कही ऍडजस्ट करूनच,
सेमिस्टर कित्येकांना क्लिअर करावं लागतं.

लोकांना समजून घेताना ऍडजस्ट,
लोक बोलतातही आता,
करून वेळ ऍडजस्ट.
सगळीकडे आता तीच ती एक बाब...
ऍडजस्टच्या फिलॉसॉफीचाच नुसता रुबाब.

तसं लिहायला खूप आहे या सब्जेक्टवर,
प्रत्येक गोष्टीत कराव्या लागतात ऍडजस्टवर.
पण शेवटी मला,
थांबावं लागणार इथूनच,
कारण मीही लिहितोय हे, थोडं ऍडजस्ट करूनच!!
थोडं ऍडजस्ट करूनच......

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
२६/०३/२०१६

मंगळवार, २२ मार्च, २०१६

वाट नवी शोधताना

'वाट नवी शोधताना'

एकदा संपू दे हे क्षण,
नंतर काय ते बघुयात.
आयुष्याच्या या पुस्तकात,
चल नवे धडे कोरूयात।।

काही हसरे,काही दुखरे,
क्षण सारे बिनधास्त झेलूयात,
सर्व काही झालेले विसरून,
आनंदाची नवी बाग फुलवूयात।।

नसे इथे कुणाशी वैर,
सारेच आपले जवळ करूयात।
हातात हात घेऊनी तव,
सोबत सर्व वाटेवरी चालूयात।।

न परका कुणी आपल्याला,
नाते घट्ट असे बांधुयात।
जन्मभर पुरतील असे मित्र,
साठवण म्हणून सारे जपुयात।।

बघा हा दृष्टिकोन जगण्याच्या,
शक्यतोवर आपण सगळेच पाळूयात।
सोडून भेद,अहंकार जागीच सारा,
चला बालपणीचे खेळ पुन्हा खेळूयात।।

©सागर बिसेन
२०/०३/२०१६
१२. ४० दुपार

"नुसतेच बघत बसणे"

"नुसतेच बघत बसणे"

गाफील आहेत रे सगळे,
इथे कुणाला कुणाशी घेणं नाही।
सर्वच आहेत रे वेगळे,
कुणाला काहीएक देणं नाही।।

भीती वाटते सर्वांना इथे,
आपल्याकडे आहे तेही संपून जाईल।
असेल मुबलक जरी जिथे,
प्रश्न तोच, संपल्यावर कोण देईल??

नुसतेच हपापलेले सारे हव्यसापोटी,
एकमेकांचे  खेच्चुन जीव घेणारे।
भुकेल्याच्या ताटातलेही अन्न तव,
स्वतःसाठी हावरटासारखे हिसकावणारे।।

बाकी मेलेत तरी चालेल एकदा,
मात्र आपले पोट सिमेपार भरावे।
समजूतच हि घेऊन बसलेत सारे,
त्यास तरी आता कुणी काय करावे??

नुसताच पैसा व त्यासाठी लुबाडणे,
प्रलोभन आमिषांचे जिथेतिथे दाखवणे।
फसलेल्यांनाच पुन्हा पुन्हा फसवणे,
अनं वैशिष्ट्य आपले हे बघत बसणे...
नुसतेच बघत बसणे,
नुसतेच बघत बसणे।।

©सागर बिसेन
२३/०३/२०१६
८:४०

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

कधी बोलेल माझ्याशी ??

कधी बोलेल माझ्याशी??

खूप खूप बोलावसं वाटतं तिच्याशी,
मनातलं गुपित खोलावंस वाटतं तिच्याशी।
पण आवडत नाही तिला हे सर्व,
म्हणून आपल्यातच बोलावं लागतं स्वतःशी।।

खरंच नसेल का आवडत आपलं बोलणं तिला,
सतत प्रश्न विचारावं लागतं मनाशी।
आपल्यासोबतच का अशी वागते ती?
का अडखळत नाही तिला बोलताना इतर कुणाशी??

कधी पर्यंत चालायचं हे सगळं,
अबोलाच असतो तिचा नुसता माझ्याशी।
आपण बोलतो जसं तिच्याबद्दल मित्रांना,
तीही नसेल का बोलत असंच कुणाशी।।

अशी तर खूप माणसे भेटतात आयुष्यात,
मात्र तिचीच कधी भेट  नाही आपल्याशी।
एकदा काय मन गुंतलंय आता तिच्यात
लगट होतच नाही आता दुसर्यांशी।।

खूप खूप बोलावसं वाटतं तिच्याशी,
स्वैर व्यक्त व्हावंस वाटतं तिच्याशी।
तरीही मी नुसताच हळव्या आशेवर जगतो,
आपण होऊन कधीतरी, ती बोलेल या वेड्याशी।।

©सागर
9403824566

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

मलाच कळत नाही...

मलाच कळत नाही...

मी कुठे असतो,
मलाच कळत नाही।
स्वतःच स्वतःला शोधायला,
वेळ मिळत नाही।।

लोक बोलतात सारे,
मी वेडा आहे।
कसे असते वेडेपण,
हेच कळत नाही।।

शोधतात लोक मला,
मी कुठे हरवलो।
मीच शोधतोय इतरांना,
कुणीच सापडत नाही।।

म्हणे कुणी मज,
कवी हा पामरांतला।
तरी मनासारखी कधी
कविता मात्र घडत नाही।।

पडलेला प्रश्न एकही, आता काही उलगडत नाही।
कितीही शोधा माणसांना, मनासारखी ती मिळत नाही।।

© सागर बिसेन
९४०३८२४५६६
०१/०२/२०१६
१२.१४

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

मन माझे बावरे

"मन माझे बावरे"

कसे हे मन माझे बावरे,
क्षणातच इकडे तिकडे होणारे।
कधी याविषयी कधी त्याविषयी,
नकळतच खोल विचारांत गुंतणारे।।
कसे हे......

कसे हे मन माझे बावरे,
कुणाशी न बोलावे म्हणणारे।
हे सांगूनही पुढच्याला सारखे,
तरी पुन्हा बोलण्यात रमणारे।।
कसे हे.......

कसे हे मन माझे बावरे,
कुणाला काही न सांगणारे।
सर्व काही लपवून ठेवतानाही,
नकळतच सर्व गुपित उलगडणारे।।
कसे हे.......

कसे हे मन माझे बावरे,
न भेटण्याचे निर्धार करणारे।
सर्व काही आपल्यात करतानाही,
कुणाची आतुरतेने वाट बघणारे।।
कसे हे........

कसे हे मन माझे बावरे,
कधी कुणाला न आठवणारे।
कुणाच्या बोलण्यातून पडता नाव,
मग सहजच आठवणींत गुंतणारे।।
कसे हे......

कसे हे मन माझे बावरे,
माझे मलाच न कळणारे।
क्षणाक्षणाला लपंडाव खेळत मजसवे,
माझेच मला न सापडणारे।।
असे हे मन माझे बावरे....

© सागर
९४०३८२४५६६

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

"शोधार्थ माणुसकीच्या"

"शोधार्थ माणुसकीच्या"

पृथ्वीवर या जन्मास येतात माणसे,
येतात जन्मास प्राणी अनं पाखरेही।
जगतात सर्वच आपल्या कष्टाने नित्य,
मात्र मारतात इथे माणसाला माणसेही।।

मातीवर बांधतात घरे इथे माणसे,
बांधतात  घरटे अनं खोपे पाखरेही।
मिळून जोपासतात सर्व आपली घरकुलं,
मात्र जाळतात इथे इतरांची घरे माणसेही।।

संपूर्ण पृथ्वीचे उपभोगी इथे माणसे,
जगतात दाणे अनं पाण्यावर पाखरेही।
दररोज असते भटकंती अन्नाच्या शोधात,
मात्र घेतात हिरावून इथे भाकर माणसेही।।

काही दिवसांचे जगणे वसुंधरेवर माणसाचे,
जगतात क्षणिक पशु अनं पाखरेही।
एकमेकांत मिसळून चरणारी अनं रवंथणारी,
मात्र पेटवतात इथे वेगळी चूल घरचीच माणसेही।।

जगणे आज अवलंबून अर्थावर माणसाचे,
सारतात आयुष्य विनापैशाने कीटक-पाखरेही।
तरीही आयुष्य सुखात असे या जीवांचे,
मात्र दुखावतात इथे पैशासाठी इतरांना माणसेही।।

कधी सुधरणार आम्ही पृथ्वीची माणसे,
शिकवतात तत्वज्ञान जगण्याचे आम्हा पाखरेही।
देती धडे जगण्याचे अनं सुखवण्याचे सर्वा,
मात्र हरवतात इथे माणुसकीच माणसेही।।

©सागर बिसेन
   ९४०३८२४५६६

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

"माफ कर मला..."

माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।

जेव्हा गरज तुला असायची,
आपले काम सोडून मी बोलायचो।
आज मला गरज तुझी आहे,
मात्र मी नुसतंच वाट बघायचो।।
का हे असं होतंय?
मलातर आता काही समजत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।१।।

जेव्हा तू दुःखात रडायचीस,
तेव्हा मीही सोबत तुला असायचो।
माझे अश्रू आवरत नव्हते तरी,
मी मात्र एकटाच दुःखात रडायचो।।
का हे असं होतंय?
मलातर आता  दुःखही वाटत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।२।।

आपली दिवसभराची कसरत करूनही,
शेवटी तुझ्यासाठीच मी रात्र
जागायचो।
मला एकटेपणा जाणवायचा जेव्हा,
तेव्हा मात्र एकटाच ताटकळत बसायचो।।
का हे असं होतंय?
मलातर आता जागूनही होत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।३।।

तुपण रमायचीस आपल्या दुनियेत,
मीही तसाच स्वैर आपल्यांत रमायचो।
मात्र तुझ्या आर्जवांवर मी,
सतत आपले जग बाजूला ठेवायचो।।
का हे असं होतंय?
आतातर माझी कोणती दुनियाच नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।४।।

असली चूक तुझी कितीही,
तरी मी समंजसपणे समजून घ्यायचो।
मात्र माझ्या छोट्याशा खोडकरपणासाठी,
मी दहादा तुला माफी मागायचो।।
का हे असं होतंय?
चुकातर आता हातूनही घडत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।५।।

नाही म्हणणार तू चुकतेस म्हणून,
होतं असं कधीकधी, मी समजायचो।
लिहावं म्हणून लिहिलं शेवटी,
कितीदा तरी हे शब्दांत कोरायचो।।
का हे असं होतंय?
मीचतर माफी मागतो, तू का नाही??
तरीही,
शेवटी,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।६।।

©सागर
९४०३८२४५६६
०९/०१/२०१६

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

नववर्षाची वाट

📝नववर्षाची वाट🙏

रिते झाले दिवस सारे,
काळ तो काळा झाला।
दिवसांमागून दिवस संपले,
बघा लगेच नवा सन आला।।

बघ काळ पडद्याआड लपला,
जणू काय तो कायमचा दूर झाला।
स्वप्न सारे उद्याचे तसेच राहिले,
नवा संकल्प मनी जन्मास आला।।

बांधलेत तरी प्रत्येकाने आज,
ते प्रत्येक क्षण भूतकाळाचे।
वेध घेत नव्या योजनांचा,
तयार मन आता पुन्हा सर्वांचे।।

दिस तेच,फक्त कॅलेंडर बदलला,
तारखा अदलाबदल झाल्यात त्या तितक्या।
माणसाचे मन आहे हे वेडे सारखे,
कमीच लालसा मनात केल्यात जितक्या।।

बदल जगाचा नियम, तारखा पाळताना,
आम्ही चाललोय भविष्यास बघताना।
कधी मागे वळत कधी समोर,
सारेच आम्ही आपल्या वाटेवर चालताना।।

©सागर
9403824566