Friday, 13 May 2016

पुन्हा एकदा!

             "पुन्हा एकदा!"

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा कुरवाळू पाहतोय...
त्या संपलेल्या दिवसांत,
पुन्हा जगु पाहतोय...
सोबत घालवलेल्या क्षणांना,
पुन्हा एकदा अनुभवू पाहतोय।।

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा वेचू पाहतोय...
नयनांच्या आश्रयाखाली,
अश्रूंनी ओलंचिंब भिजवू पाहतोय...
रडताना आजही तेच अश्रू,
आतल्या आत गोठवून पाहतोय।।

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा साठवू पाहतोय...
नजरेखाली जपत जपत,
अमर्याद राखू पाहतोय...
सोबत घालवलेल्या त्या क्षणांना,
पुन्हा एकदा घडवू पाहतोय।।

© सागर
१३/०५/२०१६
२०:१५

Wednesday, 4 May 2016

आता काय बोलावं?

आता काय बोलावं?

मला तू हवी असण्यापेक्षा,
मीच तुला नको आहे।
तुझ्या विरंगुळ्यात मी नको आहे...
त्रास होतो तुला मी असण्याचा,
वैताग येतो तुला मी बोलल्याचा।

चुका मलाच कळतात,
तुला त्या दिसत नाही...
कारण मी चुकतो दरवेळी,
तू नाही।
आयुष्यात असंच लिहिलंय आता,
मैत्रीत पण भांडण होतात,
पण तुला कधी सोडवता आला नाही...
अन मी केलेलं प्रयत्न,
तुला कधी दिसलं नाही।

मी तयार आहे मान्य करायला,
चुकलं नसेल तरी अपराधी व्हायला,
पण तू? तू कुठे असतेस तेव्हा?
कुठे मरतात तुझ्या भावना?
कुठे संपतात तुझी प्रलोभने,
तुझी आश्वासनं?

शेवटी काय तुला जगता येईल आनंदात,
कारण तुला हे सोयीचं आहे...
माझं नसणं हि तुला अपेक्षित आहे।
मैत्रीची व्याख्या तुला वैर आहे,
मी तिखट बोललेलं तुला गैर आहे।

शेवटी मीच चुकत आलो,
समजावण्याचं आर्जव घालत आलो।
लिहिता येतं तुला,
बोलता येतं तुला,
पण समजू कधी शकली नाहीस...
कारण शेवटी मी बेक्कार आहे,
मी 'असाच' आहे, हि समज तुला झाली।

आणि म्हणून..
माझ्या रडण्यावरही तुला,
कधी वाईट वाटलं नाही,
कधी मन गहिवरून आलं नाही..
तू अजूनही हसतेच आहेस,
माझ्या या बोलण्यावर,
माझ्या या मैत्रीवर,
माझ्या या रडण्यावर।।

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
०५/०५/२०१६
९:१०

Tuesday, 3 May 2016

बरसणाऱ्या पावसात

"बरसणाऱ्या पावसात"

"पावसात भिजायला आवडते,
बेधुंद नाचायला आवडते।
ओल्याचिंब झालेल्या अवस्थेत,
तुला बिलगायला आवडते।।

बेभान होऊन यौवनात,
तुझ्यासवे हुंदळायला आवडते।
केसांवरून ओल्या ओझरणाऱ्या,
त्या थेंबास बघायला आवडते।।

फुलताना सौंदर्य पावसात,
तुला मंद-धुंद बघायला आवडते।
गोऱ्यापान कायेवरून ओसरणाऱ्या,
सरी झेलायला मज आवडते।।

रिमझिम बरसणाऱ्या पावसात,
तुला गळाभेट करायला आवडते।
बेभान होऊन बरसणाऱ्या धारांत,
तू अन मी 'एक' व्हायला आवडते।।"

:- सागर बिसेन
९४०३८२४५६६
११:१५