सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

मलाच कळत नाही...

मलाच कळत नाही...

मी कुठे असतो,
मलाच कळत नाही।
स्वतःच स्वतःला शोधायला,
वेळ मिळत नाही।।

लोक बोलतात सारे,
मी वेडा आहे।
कसे असते वेडेपण,
हेच कळत नाही।।

शोधतात लोक मला,
मी कुठे हरवलो।
मीच शोधतोय इतरांना,
कुणीच सापडत नाही।।

म्हणे कुणी मज,
कवी हा पामरांतला।
तरी मनासारखी कधी
कविता मात्र घडत नाही।।

पडलेला प्रश्न एकही, आता काही उलगडत नाही।
कितीही शोधा माणसांना, मनासारखी ती मिळत नाही।।

© सागर बिसेन
९४०३८२४५६६
०१/०२/२०१६
१२.१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा