Wednesday, 4 May 2016

आता काय बोलावं?

आता काय बोलावं?

मला तू हवी असण्यापेक्षा,
मीच तुला नको आहे।
तुझ्या विरंगुळ्यात मी नको आहे...
त्रास होतो तुला मी असण्याचा,
वैताग येतो तुला मी बोलल्याचा।

चुका मलाच कळतात,
तुला त्या दिसत नाही...
कारण मी चुकतो दरवेळी,
तू नाही।
आयुष्यात असंच लिहिलंय आता,
मैत्रीत पण भांडण होतात,
पण तुला कधी सोडवता आला नाही...
अन मी केलेलं प्रयत्न,
तुला कधी दिसलं नाही।

मी तयार आहे मान्य करायला,
चुकलं नसेल तरी अपराधी व्हायला,
पण तू? तू कुठे असतेस तेव्हा?
कुठे मरतात तुझ्या भावना?
कुठे संपतात तुझी प्रलोभने,
तुझी आश्वासनं?

शेवटी काय तुला जगता येईल आनंदात,
कारण तुला हे सोयीचं आहे...
माझं नसणं हि तुला अपेक्षित आहे।
मैत्रीची व्याख्या तुला वैर आहे,
मी तिखट बोललेलं तुला गैर आहे।

शेवटी मीच चुकत आलो,
समजावण्याचं आर्जव घालत आलो।
लिहिता येतं तुला,
बोलता येतं तुला,
पण समजू कधी शकली नाहीस...
कारण शेवटी मी बेक्कार आहे,
मी 'असाच' आहे, हि समज तुला झाली।

आणि म्हणून..
माझ्या रडण्यावरही तुला,
कधी वाईट वाटलं नाही,
कधी मन गहिवरून आलं नाही..
तू अजूनही हसतेच आहेस,
माझ्या या बोलण्यावर,
माझ्या या मैत्रीवर,
माझ्या या रडण्यावर।।

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
०५/०५/२०१६
९:१०