Friday, 13 May 2016

पुन्हा एकदा!

             "पुन्हा एकदा!"

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा कुरवाळू पाहतोय...
त्या संपलेल्या दिवसांत,
पुन्हा जगु पाहतोय...
सोबत घालवलेल्या क्षणांना,
पुन्हा एकदा अनुभवू पाहतोय।।

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा वेचू पाहतोय...
नयनांच्या आश्रयाखाली,
अश्रूंनी ओलंचिंब भिजवू पाहतोय...
रडताना आजही तेच अश्रू,
आतल्या आत गोठवून पाहतोय।।

मी त्या हरवलेल्या क्षणांना,
पुन्हा साठवू पाहतोय...
नजरेखाली जपत जपत,
अमर्याद राखू पाहतोय...
सोबत घालवलेल्या त्या क्षणांना,
पुन्हा एकदा घडवू पाहतोय।।

© सागर
१३/०५/२०१६
२०:१५