बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

कवितेच्या जाळ्यातून

कवितेच्या जाळ्यातून...

आवर, आवर, तुझ्या मनाला आवर।
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर।।

शब्दांचे हे बंधन, भावनांचे इथे गुरफटने,
मनातल्या विचारांना शब्दांत इथे उतरवणे।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर....
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

कोण ऐकतो रे इथे, कुणीच आपलं नाही,
फक्त सजवत जावे ओळींत, येईल मनात जे काही।
आवर, आवर, तुझ्या मनाला  आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

मनात आलेलं सर्व, आपण सहज इथे उतरवतो।
आपल्या भावनांचा खेळ करत, दुसरा हशा पिकवतो।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

कधी सुखावर लिहितोस, कधी दुःखावर लिहितोस,
कशाला विनाकारण स्वगत, या स्वार्थी जगाला बोलतोस।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

बघ रे बघ! आपोआपच कसे शब्द जुळून जातात,
नकळतच कितीतरी मग कविता घडून जातात...
नकळतच कितीतरी मग कविता घडून जातात।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून स्वतःला सावर...।। 

©सागर बिसेन
०१/०३/२०१६
९४०३८२४५६६

"व्यथा"

तंत्रज्ञानात जगतोय म्हणे!
माझा हा भारत देश।
काळ उलटले,वर्षे संपली,
अजूनही बदलला नाही भेष।।

राजकारणावरही राजकारण झाले,
अनेक नवनवे पक्ष आले।
मत देत देत राजकारण्यांना,
सामान्यजण सारे बेजार झाले।।

शासन येते, जाते अनं बदलते,
नवनवी धोरणे जातात आखली।
योजना साऱ्या कागदांवरी राहता,
कार्यपद्धतीची तव कंबर वाकली।।

आशान्वित इथे शेतकरी,
भुकेला झोपतोय माझा बळीराजा।
राबणारा मातीच्या घरातच राहिला,
चैनीत विसावणारा बनला राजा।।

हि व्यथा आहे सर्वांची,
हे चित्र आहे 'महाराज्याचे'।
हे काव्य आहे संपूर्ण भारताचे,
भारत मातेच्या व्याकुळ जनतेचे।।

©सागर बिसेन
३१/०८/२०१६
१६:१६

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

"अजूनही दडलेलं काहीतरी!"

"अजूनही दडलेलं काहीतरी!"

मी नाही विचारलं कधी,
तुला तुझा गेलेला भूतकाळ।
तरीही दरवेळी आशा करतो,
चांगलाच असावा आपला भविष्यकाळ।।

मला काय ठाऊक तुझ्याबद्दल,
काय घडलं आणि काय नाही।
तरीही वाटतं कधीकधी मनाला,
लपून आहे अजूनही खूप काही।।

वाईट तुला, मी का बोलू?
तू सांगितलं नाहीस, तुझी चूक।
गुमानपणे ऐकून घेतो सारं,
जे काही बोलतात लोक अमुक।।

नात्याला जपताना भीती भासते?
कि गुपितामुळे तुटेल असं वाटते?
मात्र जितकी गडप होतील सत्ये,
तितकी मनात माझ्या, भीती दाटते।।

शेवटी....
तुला जपण्यासाठी सर्व ऐकावं,
जाणून वागण्याला तुझ्या,झालेली चूक समजावं।
कळेल कधीतरी तुला असं मनात मानावं,
सांग कधीपर्यंत असं खोटं खोटं जगावं??
सांग कधीपर्यंत असं खोटं खोटं जगावं??

सागर 'अर्णव'
२८/०८/२०१६
२०:००
९४०३८२४५६६

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

त्यांना समजताना

"त्यांना समजताना..."

कमी नाही या जगात,
वेड्या लोकांच्या भरतीला।
माती ठेऊन गहाण,
वेग आलाय भरतीला।।

समजणाऱ्याला समजले नाही,
दुसऱ्याच कुणाला घेऊन बसले।
दुःख हाती आले तव,
मात्र एकटेच रुसत बसले।।

वेडी आहे हि दुनिया,
या दुनियेत वेडे लोक।
आनंदाच्या क्षणांना झिडकारून,
मनवतात नुसतेच शोक।।

ज्यांची गरज होती,
त्यांना नाही शोधलं यांनी।
विसरलेत क्षणार्धातच सारे,
सोसलेत दुःख यांच्यासाठी ज्यांनी।।

©✍ सागर
१४-०८-२०१६
९४०३८२४५६६

मला सोडताना

"मला सोडताना "

नक्कीच!
तिला आनंद होणार नाही,
माझ्या गेल्यावर।
पण त्रास मात्र होतोय,
तिला कि आता असल्यावर।।

प्रेमाची शपथ घेऊन,
क्षण तीही घालवते अनं मीपण।
पण राग अनावर होतो तेव्हा,
अबोल होतो मी अनं तीपण।।

कसंही प्रयत्न मी केला,
समजून घेण्याचा।
पण कदाचित तिला,
गैरसमज होतोय...
जणू तिचं मी जगणेच मागतोय,
असं समज तिला झालाय।।

आतापासूनच समजतंय,
माहितेय मला....
आता रडवताना छान वाटतंय तिला।
नक्कीच दाटून येईल मन,
बघेल जेव्हा ती..
हे जग सोडताना मला।।

©✍सागर
९४०३८२४५६६