Thursday, 25 February 2016

कधी बोलेल माझ्याशी ??

कधी बोलेल माझ्याशी??

खूप खूप बोलावसं वाटतं तिच्याशी,
मनातलं गुपित खोलावंस वाटतं तिच्याशी।
पण आवडत नाही तिला हे सर्व,
म्हणून आपल्यातच बोलावं लागतं स्वतःशी।।

खरंच नसेल का आवडत आपलं बोलणं तिला,
सतत प्रश्न विचारावं लागतं मनाशी।
आपल्यासोबतच का अशी वागते ती?
का अडखळत नाही तिला बोलताना इतर कुणाशी??

कधी पर्यंत चालायचं हे सगळं,
अबोलाच असतो तिचा नुसता माझ्याशी।
आपण बोलतो जसं तिच्याबद्दल मित्रांना,
तीही नसेल का बोलत असंच कुणाशी।।

अशी तर खूप माणसे भेटतात आयुष्यात,
मात्र तिचीच कधी भेट  नाही आपल्याशी।
एकदा काय मन गुंतलंय आता तिच्यात
लगट होतच नाही आता दुसर्यांशी।।

खूप खूप बोलावसं वाटतं तिच्याशी,
स्वैर व्यक्त व्हावंस वाटतं तिच्याशी।
तरीही मी नुसताच हळव्या आशेवर जगतो,
आपण होऊन कधीतरी, ती बोलेल या वेड्याशी।।

©सागर
9403824566

Monday, 1 February 2016

मलाच कळत नाही...

मलाच कळत नाही...

मी कुठे असतो,
मलाच कळत नाही।
स्वतःच स्वतःला शोधायला,
वेळ मिळत नाही।।

लोक बोलतात सारे,
मी वेडा आहे।
कसे असते वेडेपण,
हेच कळत नाही।।

शोधतात लोक मला,
मी कुठे हरवलो।
मीच शोधतोय इतरांना,
कुणीच सापडत नाही।।

म्हणे कुणी मज,
कवी हा पामरांतला।
तरी मनासारखी कधी
कविता मात्र घडत नाही।।

पडलेला प्रश्न एकही, आता काही उलगडत नाही।
कितीही शोधा माणसांना, मनासारखी ती मिळत नाही।।

© सागर बिसेन
९४०३८२४५६६
०१/०२/२०१६
१२.१४